Chhatrapati Shivaji Maharaj History

Chhatrapati Shivaji Maharaj History 2022

Uncategorized

chhatrapati shivaji maharaj history : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज का इतिहास

 

All Smart Hindi – नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचे आरध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हणजेच shivaji maharaj information in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . तर जाणून घेऊया chhatrapati shivaji maharaj information in marathi म्हणजेच shivaji maharaj information in marathi  याबद्दल ……..

Chhatrapati Shivaji Maharaj History

Chhatrapati Shivaji Maharaj History

शिवाजी महाराज बालपण माहिती (shivaji maharaj balpan mahiti) 

 

Chhatrapati Shivaji Maharaj History – मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला महाराष्ट्रातील पुण्यात असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. एक आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा व सहिष्णू राजा म्हणून त्यांनी भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात आपला विशेष ठसा उमटवला आहे. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते.

जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या सात्विक स्त्री होत्या, त्या शिवरायांना लहान असताना युद्धाच्या गोष्टी सांगत असत. रामायण महाभारतातील कथा सुद्धा त्या सांगायच्या. या सर्व गोष्टींचा शिवरायांवर खूप प्रभाव झाला. ज्या काळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा भारतात विदेशी व अत्याचारी मुस्लिम शासकांचे राज्य होते. मुस्लीम शासकांद्वारे भारतीयांवर होत असलेली आक्रमणे, लूट व धार्मिक सक्ती पाहून शिवरायांनी 16 वर्षाच्या वयातच स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला.

शिवराय लहान असताना शहाजी राजांनी त्यांना व जिजाबाईंना दादाजी कोंडदेव यांच्या जवळ सोडून दिले. दादाजी कोंडदेवानीच शिवरायांना युद्ध कला, जसे घोडस्वरी, तलवारबाजी, बान मारणे असे शिक्षण दिले.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj History In Marathi) –

Chhatrapati Shivaji Maharaj History – वारकरी संप्रदाय म्हणतो आम्ही “संत ज्ञानेश्वर”, “संत तुकाराम” यांना पुजतो कारण या संतांच्या चरित्राच्या, ग्रंथांच्या, अभंगांच्या माध्यमातून आम्हास खरे  संस्कार समजले. त्यांचे तंतोतंत आचरण सुलभ जीवन आणि ईश्वर नामजपाने सुखाची सर्वोच्च आत्मभूती मिळते. अगदी त्याच प्रमाणे प्रत्येक मराठी घरांमध्ये मुलांमध्ये योग्य संस्कार रुजवण्यासाठी शिवरायांचा इतिहास सांगितला जातो.

शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र परिपूर्ण मानव कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. संस्कार कसे असावेत, योग्य मार्ग कसा निवडावा, वेळेचे महत्व, नियोजन पूर्वक कामे पूर्ण कशी करावीत, म्हणजेच आजकाल मॅनेजमेंट क्षेत्रासाठी जे काही सर्वोत्तम लागते त्याचे सर्वगुणसंपन्न उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती (chhatrapati shivaji maharaj information in marathi)

१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?

उत्तर : रायगड

२) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?

उत्तर : शिवनेरी (19 फेब्रुवारी 1630)

३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे?

उत्तर : अष्टप्रधान मंडळ

४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?

उत्तर : राजगड

५) छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता?

उत्तर : बुधभूषण

६) छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मदिर कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर : श्री शैलम (आंध्र प्रदेश)

७) छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती?

उत्तर : होण

८) छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती?

उत्तर : शिवराई

९) स्वराज्या मध्ये कोण मुख्य प्रधान होते?

उत्तर : मोरो त्रिंबक पिंगळे

१०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्य पदी कोण होते?

उत्तर : रामचंद्र नीलकंठ मुजुमदार

११) वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?

उत्तर : भोर

१२) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते?

उत्तर : हंबीरराव मोहिते

१३) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?

उत्तर : तोरणा

१४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते?

उत्तर : आदिलशहा

१५) छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले?

उत्तर : छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल थोडक्यात माहिती :

  1. रानुबाई
  2. राजकुंवरबाई
  3. दिपाबाई
  4. कमलाबाई
  5. अंबिकाबाई
  6. संभाजी
  7. राजाराम
  8. सखुबाई

शिवाजी महाराजांचे युद्ध

Chhatrapati Shivaji Maharaj History – परस्पर संघर्ष आणि मुघलांच्या आक्रमणामुळे विजापूर त्रासले होते. संधीचा फायदा घेत शिवाजी महाराजांनी आदिलशहाला न कळवता त्याच्यावर हल्ला केला आणि विजापुरात प्रवेश केला. आणि सर्वप्रथम त्याने विजापूरचा रोहितेश्वरचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. आणि त्यानंतर तोरणाचा किल्ला ताब्यात घेतला गेला.

अशाप्रकारे शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांचा ताबा घेतला, त्यांनी कोंडणा किल्ल्याचा ताबाही घेतला. त्या किल्ल्यांच्या संपत्तीने त्यांनी आपले सैन्य बळकट केले आणि किल्ल्यांची दुरुस्तीही केली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतःचा किल्ला बांधण्यास सुरुवात केली ज्याला किल्ला रायगड म्हणतात

शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या विस्ताराच्या धोरणाची माहिती मिळताच आदिलशहा संतापला. आणि त्याने शहाजीला आपल्या मुलावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले.

पण शिवाजी महाराजांनी आपले काम चालू ठेवले, वडिलांचे ऐकले नाही. त्यानंतर विजापूरच्या सुलतानाने शिवाजी महाराजांचे वडील शहाजी यांना बंदिवान केले. पुढे शहाजीला विजापूरच्या विरोधात कोणतेही काम करणार नाही या अटीवर सोडण्यात आले. शिवाजी महाराजांनी पुढील चार वर्षे विजापूरवर हल्ला केला नाही.

परंतु वर्षानुवर्षे त्याने आपले सैन्य सवाढवणे आणि शक्तिशाली करणे चालू ठेवले. आणि दक्षिण-पश्चिम मध्ये त्याची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. 1645 मध्ये शहाजीचा मृत्यू झाला.

शून्यातून स्वराज्य निर्मिती 

आपल्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये  महाराजांनी अनेक माणसे जोडली. एक एक करत अनेक लढवय्ये मावळे स्वराज्याची ताकत बनले. प्रत्येक आक्रमणांमध्ये कामी आलेल्या मराठी रक्ताने स्वराज्याची उभारणीं झाली. स्वराज्य”मराठा साम्राज्य” रयतेच्या, मावळ्यांच्या, त्यागावर, रक्तावर निर्माण झाले.

शहाजी राजांकडून शिवाजी राजांना २००० सैन्य पुणे आणि सुपे जहागिरीचा सांभाळ करण्यासाठी मिळाले होते. त्या २००० सैन्याचे लाखोंच्या फौजेत रूपांतर करून राज्य सुरक्षितता हेतू ३५० हुन ज्यास्त किल्ले शिवरायांनी जिंकले आणि नवीन निर्माण केले. शत्रूच्या लाखांच्या फौजेला ५०० मनुष्यबळ असणारा शिवाजी महाराजांचा एकच किल्ला पुरून उरत असे. हजारोंचे सैन्य किल्ल्यावर असताना शिवाजी महाराजांचे ५० ते ६० मावळे लीलया किल्ला जिंकत असत. या अचाट पराक्रमाला शिवाजी महाराजांच्या अतुलनीय नियोजन आणि बुद्धी कौशल्याची जोड असे.

शिवरायांचा विवाह/लग्न-

10 वर्षाच्या असताना 14 मै 1640 रोजी महाराजांचे लग्न सईबाई यांच्याशी लाल महल पुणे येथे करण्यात आला. शिवाजी महाराज्यांच्या पत्नीचे चे पूर्ण नाव सईबाई निबळकर असे होते.

शिवाजी महाराज शाहिस्तेखान हल्ला

मुघल शासक औरंगजेबाचे लक्ष उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वळले. औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल जाणून होता. त्याने दक्षिण भारतात त्याचा मामा शाहिस्तेखान याला सुभेदार म्हणून नेमले. शाहिस्तेखान आपल्या 1 लाख 50 हजार सैनिकांना घेऊन पुणे पोहचला व तेथे त्याने लूटपाट सुरू केली. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील लाल किल्ल्यात त्याने तळ ठोकला. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला मारण्यासाठी योजना बनवली. महालाजवळून जाणाऱ्या एका लग्न मिरवणुकीचा आधार घेत शिवाजी महाराज आपल्या काही साथीदारांसोबत पहारेकरीच्या नजरा चुकवत महालात शिरले.

महाराजांना लाल महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. आवाजाने शाहिस्तेखान जागे झाला, महाराजांना समोर पाहून तो घाबरला जीव वाचवण्यासाठी त्याने महालाच्या खिडकीतून उडी मारली. शिवाजी महाराजांनी चपळाईने त्याच्यावर तलवारीचा वार केला पण या हा वार त्याच्या हाताच्या बोटावर लागला व त्याची तीन बोटे कापली गेली. शाहिस्तेखान तेथून पडून गेला. महाराजांच्या या शौर्य मुळे त्यांची कीर्ती अधिकच वाढून गेली.

छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न उत्तर मराठी 

१) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी कोण पौरोहित होते?

उत्तर : गागाभट्ट

२) कोंढाणा गड कोणी सर केला होता?

उत्तर : तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे

३) शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती?

उत्तर : रायरेश्वराचे मंदिर

४) कोंढाणा किल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?

उत्तर : सिंहगड

५) छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता?

उत्तर : बहिर्जी नाईक

६) मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटिलकी होती?

उत्तर : वेरूळ

७) शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले?

उत्तर : प्रचंडगड

८) स्वराज्यात सचिवपदी कोण होते?

उत्तर : अण्णाजी दत्तो

९) स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पहात होते?

उत्तर : दत्ताजी त्रिंबक वाकणीस

१०) स्वराज्यात सुमंत कोण होते?

उत्तर : रामचंद्र त्रिंबक डबिर

११) स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते?

उत्तर : निराजी रावजी

१२) स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते?

उत्तर : मोरेश्वर पंडितराव

१३) स्वराज्य मध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे?

उत्तर : कारखानीस

१४) स्वराज्य मध्ये जवळपास किती किल्ले होते?

उत्तर : 370

१५) छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता?

उत्तर : 11 मार्च 1689

१६) अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते?

उत्तर : पंताजी गोपीनाथ

१७) जय सिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता?

उत्तर : पुरंदरचा तह

१८) मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?

उत्तर : कांहोजी आंग्रे

१९) छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती?

उत्तर : शाहिस्तेखान

२०)छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्य पदी कोण होते?

उत्तर : रामचंद्र नीलकंठ मुजुमदार

अफझल खान सोबत युद्ध

शिवाजी महाराजांची वाढती शक्ती पाहून आदिलशहाने सन 1659 मध्ये आपला धाडसी आणि गर्विष्ठ अफजल खान याला 120000 सैनिकांसह शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी पाठवले. अफजल खान शिवाजी महाराजांना भडकवण्यासाठी मंदिरे उद्ध्वस्त करत होता. पण शिवाजी महाराज प्रतापगड किल्ल्यावरच राहिले , शिवाजीन महाराजांनि लढण्याऐवजी अफझल खानला भेटण्याची ऑफर दिली.

दोघांना भेटल्यावर दोघांनी एक समान तलवार सोबत आणावी अशी अट घालण्यात आली. शिवाजी महाराजांना अफझलखानावर विश्वास नव्हता. त्यांनी त्यांच्या कपड्यांखाली चिलखत घातले आणि त्याच्या उजव्या हाताला वाघ-नखे बांधली.

शिवाजी महाराज आणि अफजल खान 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या किल्ल्याजवळच्या झोपडीत भेटले. तेच घडले, ज्याची शिवाजी महाराजन्ना चाहूल होती , अफझलखानाने शिवाजी महाराजांवर हल्ला केला. चिलखतामुळे शिवाजी वाचले . शिवाजी महाराज यांनी आपल्या वाघाच्या नखाने अफजल खानवर प्राणघातक हल्ला केला आणि त्याला ठार केले.

यानंतर शिवाजी महाराजांनि 10 नोव्हेंबर 1659 रोजी विजापूरवर हल्ला केला, ज्याला प्रतापगडाचे युद्ध म्हटले जाते आणि ते जिंकले

शिवाजी महाराजांचा मृत्यु कसा झाला. 

नंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी मुघलांना सळो कि पळो करून सोडले. महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या सुरत शहरावर लूट करून खूप सारे धन मिळवले. आज शिवाजी महाराज महाराष्ट्रीयनासाठी दैवता प्रमाणे आहेत. शिवाजी महाराज हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी आजही महाराष्ट्रासह पूर्ण देशात सांगितल्या जातात.

शिवाजी महाराज गोरिल्ला युद्ध कलेचे जनक म्हणून देखील ओळखले जातात. मराठा साम्राज्याचे जनक शिवाजी महाराज यांचे 3 एप्रिल 1680 साली अवघ्या चाळीस वर्षाच्या वयात निधन झाले. परंतु अवघ्या 340 वर्षानंतर आजही महाराष्ट्रीयन जनतेच्या मनात ते जिवंत आहेत.  जय हिंद जय शिवराय.

निष्कर्ष 

तर मित्रांनो आपण आजच्या आर्टिकल मधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी सर्व माहिती सांगितली आहे . आजचे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो मित्रांनो आर्टिकल मध्ये जर काही चुकी असेल किंवा काही तुम्हाला सजेशन द्यायचा असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही शंभर टक्के मला कमेंट करून सांगू शकता.

EFFECT

तर मित्रांनो राहिला विषय आता जर तुम्हाला आपली आर्टिकल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना व्हाट्सअप वर फेसबुक वर इंस्टाग्राम वर शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या दमदार आर्टिकल मध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या वेबसाईटवरील दुसरे आर्टिकल  सुद्धा वाचू शकता …….

धन्यवाद……….

1 thought on “Chhatrapati Shivaji Maharaj History 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *